पुणे

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची राज्य आरोग्य मंत्रालयाने केली. त्यामुळे चर्चेला एकाच उधाण आले. मात्र, अवघ्या चार तासात डॉ. आशिष भारती यांची नवे आरोग्य प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यांची महापालिकेत एक वर्षासाठी पदनियुक्तीवर बदली करण्यात आली असून ते दोन दिवसात पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२५ सप्टेंबर २०१८ रोजी हंकारे यांची दोन वर्षांसाठी बदली करण्यात आली होती, त्याची मुदत संपल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.

परंतु, करोनाची वाढती साथ लक्षात घेता राज्य सरकारने महापालिकेत दोन आरोग्यप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या बरोबरच डॉ. नितीन बिलोलीकर यांची नेमणूक करण्यात आली.

परंतु, त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर ते रजेवर गेले. तेव्हा डॉ. अंजली साबणे यांच्याकडे आरोग्य प्रमुख पदाचा पदभार आला. डॉ. बिलोलीकर अद्यापही रजेवर असल्याने आता एक वर्षांसाठी का होईना नवे आरोग्यप्रमुख महापालिकेला लाभले आहेत.

Related posts

पुणे- नाशिक महामार्गावरील रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; डॉ. अमोल कोल्हे

Vishal Khandagale

येरवडा नागपुरचाळ येथे विविध कामांचे भुमिपुजन

Vishal Khandagale

चर्चेला मिळाला पूर्णविराम; शरद पवार यांची “सिरम”ला भेट

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX