Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

पाकिस्तानात लॉकडाऊन शक्य नाही : पंतप्रधान इम्रान खान

Pune city News :- कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत असताना अनेक देशांनी लढा देण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे.
लॉकडाऊन शक्य नाही : पाकिस्तानातही कोरोनाने शिरकाव केला असून लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले…
पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील 25टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणंही गरजेचं असल्याचंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

Related posts

तीन प्रकारचे विशेष रुग्णालये सुरु करणार !

Vishal Khandagale

कोरोना संकटावर मात करून विजयाची गुढी उभारू !

Vishal Khandagale

कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील उपोषणच्या तयारीत

Vishal Khandagale

Leave a Comment