Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली असून ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचे सांगितलं जात आहे.

Related posts

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्मांकडून अत्याचाराची तक्रार मागे

Vishal Khandagale

Leave a Comment