Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

कोरोना; भारतात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

Pune City News :- कोरोना विषाणू मुळे भारतात आणखी एक मृत्यू झाला आहे. कोलकात्यामध्ये एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना विषाणू मुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
एएमआरआय रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या आठवडयात या व्यक्तीला कोरोना विषाणू ची लागण झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मृत व्यक्तीला ह्दयविकाराचाही त्रास होता. मृत व्यक्ती इटलीला जाऊन आला होता. त्याचे कुटुंब तिथे राहते. हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणू ने झालेला हा पहिला मृत्यू आहे.
देशात कोरोना विषाणू चे एकूण 415 रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.कोरोना विषाणू मुळे जगभरात 14 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

Related posts

उद्धव ठाकरेची केली स्तुती

Vishal Khandagale

उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

Vishal Khandagale

अमेरिकेत 25 फुटांची हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना !

Vishal Khandagale

Leave a Comment