Pune City News
राष्ट्रीय

DRDO कडून ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारताने मोठे यश संपादन केले आहे.

स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.त

बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्याली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.

पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र येथून सोडले, ही चाचणी यशस्वी झाल्याचेही सांगितले.आमीटर ते ६०० किलोमीटरपर्यं

“३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडले,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्याने दिली.

पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोतचा पल्ला गाठू शकते.

पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.

Related posts

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

टाळ्या, दिव्यांनी कोरोना पळणार नाही; राहुल गांधी

Vishal Khandagale

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

Leave a Comment