Pune City News :- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सहाय्यता कोशात देणगी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी मदत देऊन सहकार्य केले होते.मात्र आता बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खानदेखील कोरोना लढ्यात मदत करण्यासाठी पुढे सरसावला असून तो 7 कलमी कार्यक्रमाद्वारे या लढ्यात मदत करणार आहे.
★ 7 कलमी कार्यक्रम :
▪️ शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला, जय मेहता यांच्या कोलकाता नाईट रायडर तर्फे PM CARE फंडमध्ये दान करणार.
▪️ शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज स्टुडीओ तर्फे मुख्यमंत्री निधीत दान करणार.
▪️ शाहरुख खानच्या मीर फौंडेशनतर्फे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारीना 50,000 Personal Protection Equipement (PPE) देणार.
▪️ शाहरुखची मीर फौंडेशन ‘एक साथ – दी अर्थ फौंडेशन सोबत मिळून 5500 कुटुंबाना महिनाभर अन्न पुरवणार.
▪️ शाहरूखची मीर फौंडेशन ‘रोटी फौंडेशन’ सोबत मिळून महिनाभर हातावर पोट असणाऱ्या 10,000 गरीब कारागिरांना दरदिवशी 3 लाख अन्नाची पाकिटे पुरवणार.
▪️ दिल्लीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या 2500 कारागिरांना महिन्याभराचे किराणा आणि राशन भरून देणार.
▪️ शाहरूखची मीर फौंडेशन उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड येथील ऍसिड हल्ल्यातील पिडीत व्यक्तींना महिन्याला स्टायपेंड चालू करणार.दरम्यान, शाहरुखने हि माहिती ट्विटरवरून शेअर केली असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

