Pune City News
कोरोनापुणे

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Pune City News:- पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ. नायडू रुग्णालयात 100 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्ण ठेवण्याची तेथील क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्याने येनारया कोरोनाग्रस्थ बाधित रुग्णांना बोपोडी येथील पुणे महापालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात येत आहे. बोपोडी येथील रुग्णालय भरल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालयात तर चौथ्या टप्प्यात लवळे येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये, महापालिकेने 25 हजार रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. कोणत्याही रुग्णाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.शहरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. पुण्यात 24 तासात करोनाबाधित असलेल्या आणखी 5 नागरिकांचा आज मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी (दि. 7 एप्रिल) सकाळी 9 ते 11 या वेळेत 3 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 13 वर गेला आहे.

Related posts

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

शहरात 931 पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

देहू,आळंदी पालखी सोहळयाबाबत निर्णय दोन दिवसात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Vishal Khandagale

Leave a Comment