Pune City News
कोरोनापुणे

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय योजनेत पुण्यातील गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने पुणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटत असताना, पालिकेच्या कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षाने कर्मचा-यांच्या कामाला बळ मिळणार आहे.

पुढील काही दिवसात महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयात तसेच लायगुडे हॉस्पिटल, बोपोडी हॉस्पिटल, सणस मैदान व रक्षकनगर इ. ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष गोखले कन्स्ट्रक्शनकडून उभारण्यात येणार आहेत.
यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष विशाल गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते. व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले

Related posts

पुणे शहरात आज ५३९५ पॉझिटिव्ह रुग्ण; ४३२१ रुग्णांना डिस्चार्ज.

Vishal Khandagale

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale

वडगाव शेरी – पुणे शहर कॉंग्रेस (आय) कडून शिधा वाटप

Leave a Comment