पुणे

ईडीलाच पुणेरी दणका; चक्क वकिलाने बजावली नोटीस

आर्थिक घोटाळ्या प्रकरणी नोटिसा पाठवून भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच (सक्त वसुली संचालनालय) सामाजिक कार्यकर्ते ऍड. असीम सरोदे यांनी १  हजार ४४०  रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. आता ईडी या नोटिसीला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसेंवर खटला सुरू आहे. या प्रकरणात अंजली दमानिया तक्रारदार असून त्यांच्या वतीने ऍड. असीम सरोदे खटला लढवत आहेत. या प्रकरणाची काही कागदपत्रे ईडीला चौकशीसाठी हवी आहेत. ईडीचे सहायक संचालक राजेश कुमार यांनी २९  डिसेंबर २०२०  रोजी फोन करून  ऍड. सरोदे यांच्याकडे या कागदपत्रांची मागणी केली.

सरोदे यांनी याबाबत अधिकृत मेल करा असे सांगितले. त्यानंतर ईडीच्या कार्यालयातून तसा मेल पाठवण्यात आला. कागदपत्रे हवी असतील तर झेरॉक्सचा खर्च आपल्याला करावा लागेल, तसेच ही कागदपत्रे ईडीने आपला अधिकृत प्रतिनिधी पाठवून माझ्या कार्यालयातून घेऊन जावीत असे सरोदे यांनी कळवले. सरोदे यांच्याकडून कागदपत्रे घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयातून ५ जानेवारीला पुणे येथे राकेश नावाचा एक व्यक्ती आला. सरोदे यांनी त्याच्याकडे ओळखपत्र आणि ईडीने त्याला प्राधिकृत केल्याचे पत्र मागितले असता तो देऊ शकला नाही.

Related posts

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे- पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

Vishal Khandagale

परदेशवारी नाही तरीही “करोना” लागणची लक्षणे !

Vishal Khandagale

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX