Pune City News
कोरोनापुणे

Containment Zone मधील रस्ते पूर्ण सील !

Pune city News :- पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील रेड झोन प्रतिबंधित (containment zone ) भागातील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये,कोणी बाहेरचा येऊ नये म्हणून आता जे बाहेर जाण्याचे मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बांबू लावूनही लोक थांबत नाहीये व मोठ्या प्रमाणात ये-जा करता. त्यामुळे (containment zone) फक्त नावापुरते राहत असल्याने शहरातील गणेश पेठ या भागात चार ते पाच फुटाचे पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

तसेच भवानी पेठ, कसबा पेठ, घोले रस्ता, येरवडा या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ज्या भागात आहेत. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून या भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक खरेदीसाठी या भागातून त्या भागात जातात. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ज्या त्या भागातच मिळाव्या म्हणून आजपासून पेठांमधील काही भागात पत्रे लावून सील करण्यात आले आहे.

शहरातील प्रतिबंधित भागातील अनेक ठिकाणी कमी जागेतील छोट्या-छोट्या घरात जास्त व्यक्ती असलेल्या कुटुंबाची अवस्था अर्थातच खूप वाईट आहे. घरात राहूनही त्यांना शारीरिक अंतर पाळता येणे मुश्कील होत आहे. आशा सर्व झोपडी धारकांची व्यवस्था पुणे महापालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे

Related posts

दिलासादायक! शहरांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आज घट

पुण्यातून १५३ विशेष रेल्वेगाड्या रवाना !

Vishal Khandagale

15 जूनपासून महाराष्ट्रात लालपरी पुन्हा धावणार !

Vishal Khandagale

Leave a Comment