Pune City News
पुणे

बौद्ध पौर्णिमा घरातच साजरी !

Pune City News :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे व मंदिरे , बौद्धविहार बंद आहेत. त्यामुळे यंदा सर्व धर्मीयांनी घरातच राहून सण साजरे करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी (दि.8) रोजी बौद्ध समाज बांधवांनी देखील घरातच सामुहिक प्रार्थना करुन बुद्धपौर्णिमा साजरी केली. बुद्ध पौर्णिमा बुद्ध धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण आहे.

वैशाख महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली. तसेच याच दिवशी त्यांना मोक्ष प्राप्तीसुद्धा झाली होती.

यादिवशी शहर परिसरातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्ष यांच्यातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचे औचित्य साधत धम्म फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच बुद्ध विहार देखील सकाळपासून गजबजलेली असतात.

गौतम बुद्ध यांच्या जयंती उत्सवानिमित्त समाज बांधव शुभ्रवस्त्र परिधान करून सामूहिक प्रार्थना करतात. उपस्थितांना प्रसाद म्हणून खिरीचे वाटप करण्यात येते. मात्र, यावर्षी शहरातील बुद्धविहारामध्ये शांतता होती. समाज बांधवांनी घरातच राहून तथागत गौमत बुद्ध यांना अभिवादन केले.

Related posts

जागतिक परिचारिका दिनानिमित्त विभगीय आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा !

Vishal Khandagale

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Vishal Khandagale

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

Vishal Khandagale

Leave a Comment