Pune City News
पुणेमहाराष्ट्र

राज्यात दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा !

Pune City News:- राज्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.

वाईन शॉप्समध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही उपायोजना करण्यात आली आहे.

संकेत स्थळ : ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे.

 ★ ई-टोकन पद्धत★

● ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

● मद्य खरेदीसाठी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घ्यावे

● यासाठी संकेत स्थळावर ग्राहकाने मोबाईल नंबर आणि नाव रजिस्टर करायचे

● त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे.

● त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे.

● यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल.

● त्यापैकी एका दुकानाची निवड करायची आहे.

● त्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल.

● आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे.

सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

Related posts

शाळांची कोरोना काळातील फी भरावीच लागणार!- सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

लोकांशी माणुसकीने वागा: राजेश टोपे

Vishal Khandagale

Leave a Comment