Pune City News
महाराष्ट्र

13 लाख 86 हजार कामगार कामावर रुजू ; उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्योग विभाग सज्ज झाला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, असं देसाई यांनी सांगितलं.

मुंबई आणि जवळपासच्या महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव इथे अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे.

तसेच शेती आधारित उद्योगांनाही परवानगी दिली आहे. संरक्षण दलाला लागणार्‍या उत्पादनांच्या उद्योगांना परवानगी दिली, असं सुभाष देसाई म्हणाले.

देसाई म्हणाले :

▪️ देशातील विदेशी गुंतवणुकींपैकी 33 टक्के गुंतवणूक राज्यात येते. या गुंतवणुकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचं काम सुरु आहे.

▪️ रायगडमध्ये दिघी येथे 15 हजार एकरावर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. माणगाव एमआयडीसी असं या एमआयडीसीचं नाव असेल.

▪️ देशी आणि विदेशी 10 गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहे, त्यांना इथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल.

▪️ माणगावपासून मुंबई जवळ आहे, नवी मुंबई विमानतळ जवळ आहे, जेएनपीटी बंदर जवळ आहे. 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इथे होऊ शकते.

▪️ माणगाव एमआयडीसीत हजारो नोकर्‍या उपलब्ध होतील. यात इंजिनिअरिंग, औषध उत्पादक, इलेक्ट्रॉनिक असे विविध उद्योग इथे उभे राहतील.

Related posts

जानेवारीपासून शाळा सुरु करा; बच्चू कडू यांचा मुख्यंमंत्र्याना प्रस्ताव

Vishal Khandagale

‘ही’ राज्य लॉकडाउन लागू करण्याच्या विचारात !

Vishal Khandagale

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार; विविध मुद्द्यांवर होणार चर्चा

Vishal Khandagale

Leave a Comment