Pune City News
महाराष्ट्र

अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करा : मंत्री अनिल परब

मुंबईमधील लोकल रेल्वे सेवा सुरु कऱण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली आहे.

एसटी आणि बेस्ट बसेसवर येणारा ताण लक्षात घेऊन केंद्राने लोकल रेल्वे सुरू करावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्यासोबत आम्ही संपर्क साधत असून किमान अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या लोकांसाठी तरी आम्हाला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेत काम करणारा कर्मचारी वर्ग कल्याण-डोंबिवली, वसई-विरारमधून मुंबईत कामावर येणारा आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील उपोषणच्या तयारीत

Vishal Khandagale

पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

Vishal Khandagale

कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना दिलासा !

Vishal Khandagale

Leave a Comment