Pune City News
राष्ट्रीय

दिल्लीतील जामा मशिद 30 जूनपर्यंत बंद!

PUNE CITY NEWS :- दिल्लीतील जामा मशिद 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत मशिद बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इमाम बुखारी यांची माहिती : जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी 30 जूनपर्यंत मशिद बंद ठेवणार असल्याची माहिती दिली. लोकांशी व इस्लामिक विद्वानांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे बुखारी यांनी सांगितले.

कारण : शाही इमाम यांचे सचिवांचा मंगळवारी रात्री सफदरजंग येथील रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

“मानवाचं जिवन संकटात आहे अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा लोकांच्या जिवनाचे रक्षण करणं आवश्यक असतं. मानवाचं रक्षण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि शरीयतमध्येही याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे,” असं बुखारी म्हणाले.

स्पष्ट निर्णय : “लोकांचं मत जाणून घेतल्यानंतर तसेच इस्लामिक विद्वानांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळपासून ते 30 जूनपर्यंत जामा मशिदीत सामूहिक नमाज अदा केली जाणार नाही. काही ठराविकच लोक दररोज पाच वेळा नमाज अदा करतील. तर इतर नमाजी त्यांच्या घरीच नमाज अदा करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Vishal Khandagale

कोरोना : ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे पुणे प्रशासन हादरलं !

Vishal Khandagale

मोदी सरकारचा निर्णय! ‘इतक्या’ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर GST मधून सूट

Vishal Khandagale

Leave a Comment