PUNE CITY NEWS:– पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानाने मा.नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे जगावर कोरोणा विषाणूचे संकट ओढवलेल आहे यात मोठ्या प्रमाणात गरीब होरपळून जात आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊनची अंमलबजावणी होत आहे, या काळात हातावर पोट असणारे कष्टकरी बांधवाना अनेक अार्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा वेळी समाजाचा घटक या नात्याने आपण समाजाचे देणं लागलो या भावनेनं कष्टकरी ,अंध ,अपंग,विधवा ,यांच्या आर्थिक अडचणीची जाण ठेवुन ऊपाययोजना आखल्या पाहिजेत, या काळात कुणालाही एक वेळेसही ऊपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशिल असु अशी भावना मा.नगरसेवक राजेंद्र शिरसाट (सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस कमिटी ) यांनी व्यक्त केली

याचेच भान ठेवून वडगावशेरी मतदार संघातील रामवाडी वैकफिल्ड वस्ती , सिद्धार्थ नगर, संजय पार्क , विमाननगर, खुळेवाडी, आर्यनगर(साकोरेनगर), मुळीक काॅम्पलेक्स , विट भट्टी परिसर, झुंजार वस्ती या भागातील 300 गरजु कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्य किटचा पुरवठा करण्यात आला…

अन्न धान्य किटचे वाटप मा.गृहराज्यमंत्री रमेश बागवे, एन.एस.यु.आय. प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पत्की साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या मार्फत करण्यात आले.
यावेळी पुणे शहर सांस्कृतिक विभाग विठ्ठल गायकवाड, पुणे शहर काँग्रेस कमिटी सचिव विजय साबळे, सोशल मिडीया अध्यक्ष डाॅ.अनिस खान, महिला काँग्रेस ललिता जगताप, किरण पाटोळे, सतीश चौधरी, बाळु बनसोडे, एलिझाबेथ वर्गिस उपस्थित होते.

