Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’; जगातील पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र

देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून देशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. याच्या लढाईत राज्य सरकार कोणतीही कसर बाकी ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात सरकारने नुकतेच कोरोना रूग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनद्वारे उपचार करणे सुरू केले आहे. त्यातच आता राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहीम हाती घेतली आहे.

पहिले राज्य ठरणार : प्रोजेक्ट प्लॅटिना या मोहिमेवर महाराष्ट्रातील 21 महाविद्यालयांमध्ये काम सुरू केले जाणार असून तब्बल 500 कोरोना बाधितांवर या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उपचार केले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या थेरपीची ट्रायल घेणारे देशातीलच नव्हे तर जगातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

प्लाझ्मा थेरेपी : पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात, सध्या कोरोनाबाधित असलेल्या रूग्णांच्या शरीरात त्याच्या कोरोनामुक्त झालेल्याच्या पेशी टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, यामुळे कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

दिलासादायक : रूग्ण बरा होण्याचा दर प्लाझ्मा थेरपीमुळे वाढू शकतो, ही खूप दिलासादायक गोष्ट आहे. सर्वप्रथम अमेरिकेत प्लाझ्मा थेरपी ही पार पडली. कोरोनाचा नाश करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

Related posts

इंदू मिलवरुन राजकारण नकोय…!

Vishal Khandagale

एक्स्प्रेस वे वरील वाहतुक बंद !

Vishal Khandagale

मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय!

Vishal Khandagale

Leave a Comment