Pune City News
पुणे

चिंचणी च्या बाबा वर पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई…..

PUNE CITY NEWS :- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुपौर्णिमेला एका भोंदू बाबाने धार्मिक कार्यक्रम घेतला, ज्यामध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती.वाद्यांचा गजर, मिरवणूक आणि मग सर्वांसमोर महाराज काट्यांवर पाठ टेकून झोपले. यानंतर गुरूदक्षिणेत झोळी भरून पैसे स्वीकारले. शिरुर तालुक्यातील चिंचणी गावात कोरोना काळात अशी गुरूपौर्णिमा झाली आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे

सविस्तर बातमी :- कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार धार्मिक कार्यक्रमाला बंदी असताना शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त चारशे ते पाचशे लोक एकत्र येत धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशा पूर्णपणे फज्जा उडविला

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ग्रामीण भागातही आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना सगळीकडे सण व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर आषाढी वारी देखील साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त या महाराजाने चारशे ते पाचशे लोक एकत्र करत धार्मिक कार्यक्रम घेत गावात कोरोनाचे आमंत्रण देण्याचाच धक्कादायक प्रकार केला आहे.

चिंचणी येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर असून या मंदिरात तात्यासाहेब पवार हे महाराज काट्यांमध्ये झोपणे तसेच काचेच्या बाटल्यांवर चालणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम गेल्या 40 वर्षापासून गुरु पौर्णिमेला करत असतात. त्यानंतर देवाच्या पालखीची दिंडी काढली जाते. शेवटी देवाची आरती घेतल्यानंतर जेवणाच्या पंगती सुरू असताना महाराज पंगतीमधून फिरत भिक्षा मागतात. यावेळी झोळीत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दक्षिणा टाकली जाते.

गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी या गावांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. परंतु यावर्षी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेऊ नये असे शासनाचे आदेश असताना गावामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. याला ग्रामपंचायत किंवा पोलिसांची यासह कोणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यामध्ये पुणे , पिंपरी चिंचवड, चाकण व अहमदनगर या ठिकाणाहून या कार्यक्रमांमध्ये महिलांसह पुरुष सहभागी झाल्याचे दिसून आले.

पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई :- 

पोलिसांनी कायदाचा बडगा चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे

अनिल माणिक पवार आकाश संभाजी पवार ,अमोल सोनबा पवार ,दत्ताजय पांडुरंग पठारे,श्रीकांत हिरामण पवार,प्रेमराज भगवान खुले, गोरख शिवाजी पवार ,राजेंन्द्र आबासाहेब पवार,अनिल सुभेदार पवार ,लक्ष्मण बाबासाहेब पवार संभाजी बाबासाहेब पवार
सर्व रा.चिंचणी व इतर 30-35 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून , तोंडाला मॉस्क न लावता , मा.जिल्हा अधिकारी साहेब पुणे यांच्या आदेशाचा भंग केल्याने वरील सर्वांवर शिरूर पोलिस ठाण्यात कलम 188नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे साहेब यांच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सद्य घडीला कोरोना साथीमुळे शासन आदेशा नुसार फक्त
अंतिम संस्कार व लग्नसोहळ्यासाठीच मर्यादित नागरिकांच्या उपस्थित हे दोन विधी करता येतील, धार्मिक सोहळे , राजकीय मेळावे किंवा स्नेहमेळावे , एकजित
जेवणावळी अशा सर्व कार्यक्रमावर बंदी असून कुणीही शासन आदेशाचा भंग केला तर त्या इसमावर कठोर कारवाई केली जाईल

Related posts

निगडी येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलवर शिक्षण विभागाची कारवाई

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा !

Vishal Khandagale

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

Leave a Comment