Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

निगडी येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलवर शिक्षण विभागाची कारवाई

PUNE CITY NEWS :-  पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरातील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने
धाड टाकुन शाळा सील करण्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतून पुस्तक विक्री करण्यास बंदी असतांनाही या शाळेतून अव्वाच्या सव्वा दराने पालकांना पुस्तके विक्री केली जात होती.त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण मुलांना दिले जाते. सद्यस्थितीत ऑर्चिड शाळेत ऑनलाईन  शिक्षण सुरू त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तके, वह्या घ्याव्यात असा आग्रह शाळा प्रशासनाचा होता. त्यासाठी शाळेने कॅम्पसमध्येच दुकान थाटले होते. कॅम्पसमध्ये वह्या, पुस्तके, गणवेशांची विक्री केली जात होती. याबाबत पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागात तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने शाळा प्रशासनाला नोटीस दिली होती. तसेच हा प्रकार त्वरित थांबवण्यास सांगितले होते. मात्र तरीही शाळा प्रशासनाने पुस्तकांची दुकानदारी सुरुच ठेवली होती. तसेच वार्षिक शुल्कासाठीही शाळा प्रशासनाकडून तगादा लावला होता.

याबाबत अनेक पालकांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी व मेलद्वारे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागातील अधिकारी विलास पाटील यांनी प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेवर कारवाई केली. याबाबत शाळेचे संचालक डॉ. राजीव सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

याबाबत शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले की, आमच्याकडे शाळेबाबत पालकांनी तक्रार केली होती. की शाळा प्रशासन त्यांना वह्या, पुस्तके आणि गणवेश घेण्याबाबत सक्ती करत आहेत. तसेच फी बाबत दे

Related posts

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Vishal Khandagale

शेतकरी संघटनांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा धडकणार

Vishal Khandagale

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना’ शहरात लवकरच राबवणार !

Vishal Khandagale

Leave a Comment