पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी( दि.५) रोजी पदभार स्वीकारला.
पिंपरी चिंचवड शहरातील गुंडगिरी मोडून काढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास ९९टक्के लोक कायदा पाळतात. फक्त १टक्के लोकच कायद्याचे पालन करत नाहीत.
त्यामुळे जे गुंडगिरी पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी असे समजू नये की, कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. मी कुणाच्याही दबावाला बळी पडत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी बेकायदेशीर उद्योग करू नयेत, अशा गोष्टी माझ्यासमोर चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय कायद्यात राहणाऱ्या व्यक्तींशी मी सदैव पाठीशी राहणार आहे.

