Pune City News
पुणे

खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ

जम्बो हॉस्पिटलमध्ये सोई-सुविधांची कमतरता असून पुणेकरांच्या मोठ्या तक्रारी आहेत. शिवाय केवळ ३३० बेड्स उपलब्ध असतानाही रुग्णांचे हाल होत आहेत.

याबाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

जम्बो रुग्णालयात रुग्ण दाखल करायला सुरुवात केल्यापासून मोठ्या तक्रारी येत आहेत. शिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यूही कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने झाला होता. या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून ‘जम्बो’च्या समस्या मांडल्या.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असनातानाही गंभीर रुग्णांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही टक्केवारी खाली आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तसेच टेस्टिंगसंदर्भात खासगी लॅबमध्ये RT-PCR ची संख्या जास्त असली तरी सरकारी लॅबमध्ये कमी आहे, ती वाढवण्यात यावी, अशी मागणीही या बैठकित करण्यात आली आहे.

Related posts

पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव

Vishal Khandagale

शिरूर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

Leave a Comment