Pune City News
पुणे

‘वंचित’च्या शिष्टमंडळाने घेतली साखर आयुक्तांची भेट

वंचित बहुजन आघाडी ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी साखर आयुक्तांची पुण्यात भेट घेतली.

यावेळी त्यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मजुरांना २५० ग्रॅम साखर दररोज मोफत द्यावी, नोंदणीकृत संस्थेमार्फत कोटा गाडी मुकादम यांची नोंद करावी, मंडळाकडे तोडणी मजूर कामगार व वाहतूकदारांना प्रोविडेंट फंड, ग्रॅच्युईटी, विमा व वैद्यकीय सुविधा हक्कांच्या शैक्षणिक सवलती लागू कराव्यात.

तसेच ऊस तोडणी दरात प्रत्येकी चारशे रुपये टन करावा व वाहतुकीच्या दरात वाढ करावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी, पद्मश्री विखे-पाटील विमा योजनेअंतर्गत प्रत्येक तोडणी व कामगार वाहतूकदारांचा मुकादमाला प्रत्येकी पाच लक्ष रुपये मोबदला मिळाव.

बैल जोडीला एक लक्ष रुपये तसेच बैलगाडी व सोबत असलेल्या गाई म्हशी कालवडी बगार यांचाही विमा भरावा, विम्याचा हप्ता प्रीमियम ५० टक्के रक्कम कारखाना व ५० टक्के रक्कम राज्य सरकारने भरावी यांसह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

Related posts

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

Vishal Khandagale

कोरोना : कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा !

Vishal Khandagale

अंगारक चतुर्थी

Vishal Khandagale

Leave a Comment