महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्याची विनंती अर्ज दाखल केला आहे. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असल्याचे बोललं जात आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

नुकतंच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायलयाने विनंती अर्ज दाखल केला आहे. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल.

Related posts

मुख्यमंत्री ठाकरे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत!

Vishal Khandagale

पुणेकर गिरिप्रेमी जितेंद्र गवारेची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

Vishal Khandagale

पुन्हा महाराष्ट्रात परवानगीशिवाय नो एन्ट्री !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX