Pune City News
राष्ट्रीय

महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.

नासामधील महिला अंतराळवीर ४१ वर्षीय कॅथरीन रुबिंस हिच्यासाठी मात्र या निवडणूक मतदानाचा अनुभव यावर्षी हटके असणार आहे.

कॅथरीन ऑक्टोबरच्या मध्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. विशेष म्हणजे ती अंतराळ स्टेशनमधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे.

अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही पहिलीच महिला अंतराळवीर ठरणार आहे.कॅथरीनने यापूर्वी ७ जुलै २०१६ मध्ये प्रथम अंतराळात झेप घेऊन स्पेस स्टेशनवर ११५ दिवस मुक्काम केला होता. आता ती दुसऱ्या वेळी अंतराळ प्रवासाला जात आहे. कॅथरीन ३२२ किमी उंचीवरून मतदान करेल आणि नासा हे मतदान गुप्त राहील याची  काळजी घेईल असे समजते. कॅथरीन या प्रवासात सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहे.

Related posts

नोटछपाई ‘एवढ्या’ दिवसांसाठी बंद

Vishal Khandagale

सलग आठव्यांदा भारताची UNSC च्या अस्थायी सदस्यपदी निवड

Vishal Khandagale

गॅस सिलेंडर महागले

Vishal Khandagale

Leave a Comment