Pune City News
राष्ट्रीय

‘चीनबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी कारवाईचा पर्याय’

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी लडाखमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबद्दल मोठे विधान केले आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओसह काही भागातून चीन मागे हटायला तयार नाही.

  • लष्करी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अजूनही हा पेच सुटू शकलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीडीएस बिपीन रावत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
  •  पूर्व लडाखमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अतिक्रमण परतवण्यासाठी लष्करी कारवाईचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  •  दोन देशांमधील लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेतून काही तोडगा निघाला नाही, चर्चा निष्फळ ठरली तरच लष्करी पर्याय वापरावा लागेल असे बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
  • संरक्षण दलांवर सीमेवर लक्ष ठेवण्याची, टेहळणीची आणि अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असते. संरक्षण दलं लष्करी कारवाईसाठी नेहमीच सज्ज असतात” असे सीडीएस रावत म्हणाले.

Related posts

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

26 कंपन्यांचे होणार खासगीकरण

Vishal Khandagale

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

Leave a Comment