Pune City News
पुणे

चाकण येथे एकाचा निर्घृणपणे खून

murder

चाकण येथील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याजवळील पत्र्याच्या शेडच्या भाजी मंडईत कचरा गोळा करणाऱ्या पुरुषाचा मृतदेह आढळला. कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास राजाराम घुंबरे, ( वय-४८, सध्या रा. चाकण, मुळ रा. पाथर्डी, जि. अहमदनगर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

चाकण बसस्थानकाजवळील भाजी मंडईत पत्र्याच्या शेडमधील सिमेंटच्या कट्ट्यावर शनिवारी दुपारी अडीचच्या पूर्वी खून करण्यात आला असून याबाबत नाणेकरवाडीचे पोलीस पाटील राजू नाणेकर यांनी पोलिसांना माहिती दिली.

Related posts

राष्ट्रवादी पक्षाची भुमिका व सरकारी योजना सर्वसामान्य जनते पोहचवा- शहराध्यक्ष विजय बापु डाकले

Vishal Khandagale

‘कमवा व शिका’ योजना विद्यार्थ्यांना – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale

Leave a Comment