Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाचा रुग्ण!

Pune City News: जगातील सर्वात सुरक्षित समजले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या व्हाइट व्हाऊसमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे.
उपराष्ट्रपती माइक पेनेस यांच्याबरोबर असणाऱ्या एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
उपराष्ट्रपती कार्यालयाचे माध्यम सचिव कॅटी मिलर म्हणाले:
उपराष्ट्रपती माइक पेनेस यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, करोनाबाधित अधिकारी कोणाच्या संपर्कात आली याची माहिती घेतली जात आहे.
ही कोरोनाबाधित व्यक्ती काही दिवसांमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व उपराष्ट्रपती माइक पेनेस यांच्या संपर्कात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींचे डॉक्टरांचे पथक व सिक्रेट सर्व्हिस एजेंट व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करत आहेत. शिवाय व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेच्या सभागृहातील बैठकीची व्यवस्थाही बदलली आहे.

Related posts

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

Vishal Khandagale

वायसीएमसमोर डॉक्टरांचे आंदोलन

Vishal Khandagale

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Vishal Khandagale

Leave a Comment