पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९६ हजार ९९० इतकी आहे. त्यापैकी २ लाख ५६ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
तसेच जिल्ह्यात ॲक्टीव रुग्णांची संख्या ३३ हजार ६९१ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यँत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ६ हजार ८१४ इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण २.२९ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८६.३६ टक्के आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात २ हजार ८८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

