Pune City News
पुणे

आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आळंदी देवाची येथून जवळच असलेल्या वडगाव घेनंद (ता.खेड) गावच्या घाटात चौदा वर्षीय मुलाला गाडीवर घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

यात आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पिढीत मुलाच्या आईने याबाबत आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (दि.६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी येथून चौदा वर्षाच्या मुलाला गाडीवर बसवून सोळा वर्षीय मुलगा त्याला वडगाव घाटात घेऊन गेला इथे त्याच्यावर त्याने अनैसर्गिक अत्याचार केले.

त्यानंतर हे कोणाला सांगू नको तुला पाणीपुरी चारतो,गाडी शिकवतो असे म्हणत परत आळंदीत घेऊन आला व पाणीपुरी चारून घरा जवळ सोडले.

घरी परतल्यावर चौदा वर्षीय मुलाला त्याच्या आईने विचारणा केली असताना त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आईने मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Related posts

शेतकरी संघटनांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा धडकणार

Vishal Khandagale

सलग 12 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Vishal Khandagale

महानगरपालिकेकडून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

Vishal Khandagale

Leave a Comment