मागील नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर शनिवारवाडा पर्यटकांसाठी बुधवार पासून सुरू करण्यात आला.
लॉक डाऊनपासून शनिवारवाडा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. पर्यटकांना प्रवेश देतांना ऑनलाइन तिकीट, थर्मल स्कॅनिंग, मास्क अशी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
राज्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू होत असताना शनिवारवाडा सुरू करण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारवाडा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे.
शनिवारवाड्यात प्रवेश करण्याअगोदर स्कॅनिंग करण्यात येणार आहे. पर्यटकाने ऑनलाइन स्कॅन करून तिकीट घेतल्यावर त्या पर्यटकाचे फाटकावरच तापमान मोजण्यात येईल.

