Pune City News
पुणे

श्रीक्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध : भुजबळ

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांचा 341 वा राज्यभिषेक सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर येथे पार पडला.

यावेळी आमदार अशोक पवार, शंभूराजे राज्यभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कंद, सिद्धांत कंक, आकाश कंक, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, तुळापूर ग्रामस्थ तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शंभूभक्त उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दूरचित्रवाणी मालिकेच्या माध्यमातून जगाच्या काना कोपऱ्यात पोहचविण्याचे काम झाले.

छत्रपती संभाजी राजे यांनी अनेक लढाया जिंकत आपला पराक्रम सिद्ध केला. आपण या पराक्रमापासून प्रेरणा घेत महाराजांचा इतिहास जगाच्या समोर आणला पाहिजे.

तसेच जनता, राज्य तसेच राष्ट्राची सेवा केली पाहिजे. राज्यभिषेक सोहळा प्रत्येक वर्षी उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास एका दृष्टिक्षेपात कळण्यासाठी शंभुसृष्टी निर्मितीच्या कार्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी मास्क लावले पाहिजे, सामाजिक अंतराचे पालन केले पाहिजे, लस घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related posts

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

Vishal Khandagale

Leave a Comment