Pune City News
गुन्हे विषयकपुणे

सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन चिखले यांचा कोरोनाने मृत्यू

शहर पोलीस दलातील हडपसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन रामचंद्र चिखले ( वय ५७) यांचे कोरोनामुळे आज ( बुधवारी) निधन झाले.

सहाय्यक पोलीस फौजदार जनार्धन चिखले मागील पाच वर्षांपासून हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १८ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

त्यांच्यावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचा बुधवारी( दि.३०) रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोरोनामुळे आतापर्यंत ९ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

Related posts

कोंढवा पोलिसांकडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस !

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

Leave a Comment