Pune City News
पुणे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुणे येथे आगमन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सोमवारी  येथील राजभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवार, दि.१९  जानेवारी रोजी सकाळी ११:३०  वाजता प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांगता कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

तसेच सायंकाळी १६ : ३०  वाजता एफटीआयआय संस्थेच्या नभ अभिप्सा अद्वितीय धातु कला स्थापना (हीरक महोत्सवी – १९६०-२०२०  ) उद्धाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

बुधवार, दि.२०  जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता राजभवन पुणे येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Related posts

मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

Vishal Khandagale

मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली उपायुक्तांच्या गाडीची तोडफोड

Vishal Khandagale

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

Leave a Comment