पुणे

बारामतीतल्या मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसीलदार

PUNE CITY NEWS :- बारामती शहरात राहणाऱ्या व मटका व्यावसायिकाच्या घरात जन्मलेल्या विक्रांत कृष्णा जाधव या तरुणाने घरची परिस्थिती व वातावरण नसताना घरच्या आसपास सगळा गोंधळ, विचित्र लोक असताना वडिलांनी याचा कधी त्रास होऊ दिला नाही.

आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीवर व प्रामाणिक कष्टाच्या जीवावर व आई व लहान भावाच्या पाठिंब्यावर नायब तहसीलदार होण्याचा मान मिळवला.

बारामती शहरातील नावाजलेल्या मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांचा विक्रांत हा मोठा मुलगा आहे. वडिलांचा मटक्याच्या व्यवसाय असल्याने वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला.

सुरुवातीला वकिली पेशात प्रवेश करायचे ठरवलेल्या विक्रांतने वडिलांच्या इच्छे खातीर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्याने खचून गेल्याचे विक्रांत यांनी सांगितले.

मात्र २०१७ मध्ये जोमाने ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने रोज १० -१२ तास अभ्यास सुरू केला १०१८ साली सहाय्यक कक्षाधीकरी म्हणून भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांकावर निवड झाली होती.

५ नोव्हेंबर २०१८ साली मटका व्यवसायाच्या वादातून वडिलांचा खून झाल्यावर घराची जबाबदारी आल्यावर १९ मार्च २९१९ ला त्यांची या पदावर निवड झाली होती.

शुक्रवारी दि. १९ रोजी लागलेल्या निकालात नायब तहसीलदारपदी त्याची निवड झाली. विक्रांत यांचे म ए सो हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाले असून टी.सी कॉलेज मधून कॉमर्स मधून पदवी मिळवली आहे.

एमपी एससीमधून सध्या सहाय्यक कक्षाधीकरी म्हणून विक्रांत रुजू आहे. तसेच भविष्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पदी विराजमान होण्याचा मानस विक्रांत यांनी बोलून दाखवला.

Related posts

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX