Pune City News
पुणे

कृषी कायद्याविरोधात शरद पवार मैदानात उतरणार

शरद पवार

कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत तीन दिवसांचे आंदोलन होत असून या आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४ व २५ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे.

या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक यांनी या मागची पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्यांना विरोध केला असून शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, या आंदोलनात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा सहभागी होणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

Related posts

अजित पवार यांना स्वप्न पडत असतील तर आम्ही ही त्यांचे बाप आहोत: चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेले रुग्ण बेपत्ता

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तू बाबत सुचना -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment