Pune City News
पुणे

भिडे फुलाजवळ मगर दिसल्याची अफवा

भिडे फुलाजवळ मगर दिसल्याचा फोन तरूणाने पोलिस नियंत्रण कक्षाला केला होता. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन खातरजमा केली. मात्र, पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लास्टिकची बाटली मगर सदृश्य दिसल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नदीपात्रात मगर आल्याच्या अफवेने भिडे पुलावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

भिडे पुलावरून जाणा-या काही नागरिकांना आज दुपारच्या सुमारास नदीपात्रात मगर असल्याचे जाणवले. त्यामुळे एका तरूणाने पुणे पोलिस नियत्रंण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी येथे धाव घेत मगरीचा शोध सुरू केला.

परिसरातील नागरिकांना पोलिसांनी मगर कुठे दिसली अशी विचारणा केली. त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना एक ठिकाण दाखवले. पोलिसांनी तेथे बारकाईने पाहणी केल्यानंतर पाण्यातील कच-यामध्ये प्लास्टिकची बाटली अडकली होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाटली हलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना मगरीचा भास झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

Related posts

बावधनजवळ खाजगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात: तीन जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

महिला पोलीस उपायुक्तांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

Vishal Khandagale

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर; आबा बागुल

Vishal Khandagale

Leave a Comment