Pune City News:- कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत पुणे महानगरपालिका व लता मंगेशकर मेडिकल फौंडेशनचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये “सामंजस्य करार”, करण्यात आला आहे.या “सामंजस्य करारावर”,पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा,रुबल अग्रवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने विश्वस्त व वैद्यकीय संचालक .डॉ.श्री.धनंजय केळकर यांनी सह्या केल्या. याप्रसंगी पुणे मनपाच्या सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ.भट उपस्थित होते.

सदरच्या करारानुसार पुणे शहरातील व पुणे मनपाने शिफारस केलेले पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्ण यांच्या उपचाराकरिता रुग्णालयात १२५ बेड,व अतिदक्षता विभागातील १५ बेड आरक्षित करण्यात येतील. शासनाच्या योजनेनुसार रुग्णालय उपचार केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त १२५ बेड आयसोलेशन करिता व १५ बेड ICU करिता आरक्षित करण्यात येतील.रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर येत्या तीन महिन्यात पुणे मनपाच्या वतीने बिलांची पूर्तता केली जाईल.रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्व जबाबदारी रुग्णालयाची राहील.रुग्णालयास आवश्यकतेनुसार पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीपीई किट्स,एन-95,मास्क, वितरित करण्यात येतील.
Pmc Fb

