Pune City News
महाराष्ट्र

शरद पवारांनी घेतली कोरोनाची लस

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष  खासदार  शरद पवार यांनी आज मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली.

यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील रुग्णालयात उपस्थित होत्या.

प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचण्यात आली.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

दरम्यान, देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

Related posts

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध; काँग्रेसचं मुंबईसह राज्यभरात आंदोलन

Vishal Khandagale

अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी

Vishal Khandagale

विघ्नहर गणपती मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक

Vishal Khandagale

Leave a Comment