Pune City News
आरोग्यकोरोनापुणे शहरमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

लाईव्ह पाहण्यासाठी : facebook.com/CMOMaharashtra

महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आज पुण्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करणार आहेत.

मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करु शकतात?

● कोणत्या जिल्ह्यात काय निर्बंध असू शकतात याबाबतची माहिती मुख्यमंत्री सांगण्याची शक्यता आहे.

● महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या रात्रीच्या जमावबंदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

● सध्या रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी आहे. हा वेळ वाढवून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू शकते.

● पुण्यात ज्याप्रमाणे दिवसा जमावबंदी आहे, त्याप्रमाणेच कोरोनाचा उद्रेक असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा जमावबंदी लागू होऊ शकते.

● राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरु राहण्याची शक्यता आहे.

Related posts

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

Vishal Khandagale

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

पुणे शहरात पॉझिटिव्ह सतत कायम रुग्णांची वाढ.

Vishal Khandagale

Leave a Comment