Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Pune City News:-‘येस बँके’च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत.
आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘येस बँक’ संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे.5 मार्च रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.आतापर्यंत केवळ एक तृतीयांश ग्राहकांनी 50 हजार रुपये काढले आहेत. ‘येस बँके’च्या सर्व सेवा बुधवारी सुरु होतील, अशी माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन दिली. सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात ‘येस बँके’ने आश्वस्त केलं.आपण देशभरातील आमच्या 1,132 शाखांमध्ये कुठेही जाऊन 19 मार्चपासून बँकिंग व्यवहार करु शकता, असंही बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

Related posts

केरळ मधून मुंबईत डॉक्टर, नर्सची विशेष टीम

Vishal Khandagale

करोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

उर्वरित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आता नाही : आयओसी

Vishal Khandagale

Leave a Comment