आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगर

पुणे मेट्रोवर होणारा खर्च थांबवून ; पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर खर्च करा!

पुणे शहर: – महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या आढळणाऱ्या शहरांपैकी पुणे देखील असून, पुणे महापालिकेची, शहरांमधील नवीन आर्थिक वर्षातील सर्व विकासकामे आणि मेट्रो वर होणारा खर्च थांबवून, तो सर्व पैसा पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर आणि आरोग्य सेवेची संलग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादीच्या विजय डाकले, पुणे शहराध्यक्ष्य, सामाजिक न्याय विभागाकडून पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागा कडून एक पत्र, पालकमंत्र्यांना दिले गेले असून यात, ‘करोना महामारीमुळे पुणे शहरांमधील आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली आहे. पुण्यात रोज करोना बाधितांचा आकडा वाढतच असून, रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कितीही निधी दिला, तरी पुण्यातील सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार यामुळे पुण्यात करोना बाधित रुग्णांचे  प्रमाण वाढत आहे,’ असे म्हटले आहे.

तसेच, ‘पुण्यातील सत्ताधारी भाजपा पुणेकरांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. पुणेकर नागरिकांना चांगली आरोग्य सेवादेण्या ऐवजी, सत्ताधारी आंदोलने, कायदेभंग आणि ठेकेदारांकडून मिळणाऱ्या मलईसाठी काम करत असल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोपदेखील या पत्रकातून सत्ताधारी भाजपवर करण्यात आला आहे.

त्यामुळे, नवीन विकास कामे चालू न करता, सध्याच्या परिस्थितीत आवश्यक ती आणि गरज असतील तीच कामे चालू ठेवावीत आणि इतर विकास कामांमधला निधी, पुणेकरांच्या आरोग्यसेवेवर आणि त्यांच्याशी संलग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा, तसेच, सध्याच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचा जीव महत्त्वाचा आहे हे लक्षात घेता, राज्य सरकारने त्वरित पुणे महापालिकेला नवीन वर्षातील विकासकामे आणि मेट्रोची काम थांबवून, त्यातील निधी आरोग्यसेवेवर खर्च करण्याबाबत आदेश द्यावेत, अशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे.

Related posts

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 186 वर

Vishal Khandagale

शहरात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

Vishal Khandagale

नायडू रुग्णालयातील ” त्या” 22 जणांच्या मृत्यूची चौकशी करा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.