Pune City News
पुणे शहर

23 गावांच्या समावेशाबाबत हरकती व सूचनांवर सुनावणी 19 व 20 एप्रिलला !

पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन 23  गावांचा समावेश करण्याची अधिसूचना नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेमार्फत प्रसिध्द करणेत आली होती. त्याकामी नागरिकांच्या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या उपसचिवांच्या पत्रान्वये हरकती व सूचनांचा छाननी करून संबंधीतानां सुनावणी देण्याकरीता शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे..

सुनावणीचे कामकाज 19  एप्रिल ते 20 एप्रिल 2021 या कालावधीत होणार आहे.

  • दरम्यान गावनिहाय प्राप्त अर्जावर 19 एप्रिल रोजी
  1. सुस-1
  2. कोपरे-1
  3. नऱ्हे-1
  4. वडाची वाडी-1
  5. नांदोशी-1
  6. किरकीटवाडी-1
  7. होळकरवाडी-2
  8. मांजरी बु-5
  9. कोळेवाडी-5
  10. वाघोली-5

सर्वसाधारण अर्ज-11

  1. नांदेड-68
  • 20  एप्रिल २०२१
  1. पिसोळी-389
  •  एकूण 491 अर्ज प्राप्त झाले आहेत.

या हरकतीवर सुनावण्या घेण्यात येणार आहेत.याबाबतचा तपशीलवार नियोजित कार्यक्रम संबंधित गावातील चावडीवर व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाहिरपणे डकविण्यात येणार आहे. तसेच हरकतदारांना वैयक्तिकरित्या नोटीसाही देण्यात येणार आहेत.

वरील कालावधीत नमुद केलेल्या गावामधील हरकतदारांनी नियोजित वेळेत, दिनांकास व ठिकाणी उपस्थित राहणेबाबत संबंधीतानां आवाहन केले असल्याची माहितीही प्रसिध्दी पत्रकानव्ये दिली आहे.

 

Related posts

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले

Vishal Khandagale

शहरात 3463 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vishal Khandagale

Leave a Comment