Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

Home Quarantine कोरोना बधितांवर आता अ‍ॅप द्वारे पालिकेची नजर

पुणे शहर :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. सध्या शहरात 54 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असून यापैकी कमी लक्षणे असलेले 50 हजार रुग्ण (Home Quarantine) गृह विलगिकरणात आहेत. यामध्ये काही कुटुंबच्या कुटुंब आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या असल्याने त्यांना मोनेटरिंग करणे अवघड जात आहे.

तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना तातडीने उपचार मिळणे अवघड झाले आहे.

यापार्श्वभूमीवर महापालिकेने होम आयसोलेशन रुग्णांचे मोनेटरिंग करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या रुग्णांना मोबाईल वर हे अ‍ॅप डाउनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. या अ‍ॅपमध्ये रुग्णाने त्याची ऑक्सिजन पातळी, तापमान व अन्य काही त्रास होत असेल त्याची नोंद रुग्णांने अथवा त्याच्या नातेवाईकाने करणे बंधनकारक राहणार आहे.

रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे अथवा ताप व अन्य लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या डॅशबोर्ड वर समजणार आहे. तसेच हे अ‍ॅप डाऊनलोड केलेला हा मोबाईल रुग्णासोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कोरोना रुग्ण बाहेर गेल्यास त्याचीही माहिती डॅशबोर्ड वर दिसणार आहे.

Related posts

राज्यात पुन्हा LOCKDOWN पुन्हा वाढवला !

Vishal Khandagale

ब्रेकिंग! नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार

Vishal Khandagale

पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रेनिमित्त जादा बसेसचे नियोजन

Vishal Khandagale

Leave a Comment