Pune City News
महाराष्ट्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा: अजित पवार

पुणे शहर :- ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Related posts

पाच हजार जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात : मंत्री. राजेश टोपे

Vishal Khandagale

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

कोरोनामुळे मुंबई सह “एकुण” मृत्यू !

Vishal Khandagale

Leave a Comment