Pune City News
गुन्हे विषयकपुणेपुणे शहरवडगावशेरी

खराडी पोलिसांची मोठी कारवाई – ४ कोटी २७ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त, ६ जण अटकेत

पुणे, दि. १६ फेब्रुवारी २०२६ – खराडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले असून एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेली टोळी उद्ध्वस्त करण्यात आली असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३५ वाजता ई-ऑन फेज २ मागील गेटजवळ दोन इसमांकडून २७ ग्रॅम एमडीसह १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर तपासाची साखळी पुढे नेत पोलिसांनी राजस्थानपर्यंत धाड टाकत संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले.

तपासादरम्यान राजस्थान राज्यातील मुख्य पुरवठादारांकडून पुण्यात एमडीची विक्री होत असल्याचे समोर आले. विविध ठिकाणी छापे टाकून १ किलो ३८४ ग्रॅम एमडी (२ कोटी ७६ लाख ८० हजार रुपये किंमतीचा), तसेच मोबाईल, रोख रक्कम आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.

एकूण कारवाईत १ किलो ९६० ग्रॅम एमडी, मोबाईल फोन, फॉर्च्युनर गाडी आणि अन्य साहित्य असा ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यवहारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts

मंडप व्यासायिकाची गळफास घेऊन आत्महत्या…..

Vishal Khandagale

वडगावशेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर पार !

Vishal Khandagale

राज्यात कोरोनाच्या चाचण्या कमी : फडणवीस

Vishal Khandagale

Leave a Comment