Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

CRPF च्या आणखी 6 जवानांना कोरोनाची लागन !

Pune City News :-केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथे नियुक्त असलेले 139 अधिकारी आणि सेवेसाठी असलेल्या 12 जणांपैकी 5 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती.त्यानंतर आता आणखी 6 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून 146 कर्मचाऱ्यांना कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते.

त्यानंतर तात्काळ या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता यापैकी 6 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका टळला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

Related posts

खासदार संजय राऊत अडचणीत; महिलेने केले गंभीर आरोप

Vishal Khandagale

भारतातील Google चे ऑफिस बंद! “वर्क फ्रॉम होम”

Vishal Khandagale

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

Leave a Comment