Pune City News
कोरोनापुणे

कोंढव्यात “आरएएफ”ची एंट्री..

Pune City News:- पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सोमवारी(१८)रोही शीघ्र कृती दलाचे जवान ( रॅपिड ऍक्शन फोर्स ) पाचारण करण्यात आले आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात आरएएफ (RAF) च्या जवानांनी रुट मार्च काढला होता.

पुणे पोलिसांसोबत आरएएफ (RAF) चे जवानही शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचं काम पाहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवशी करोनाचे १०२ रुग्ण आढळले होते तर पिंपरी चिंचवड मध्ये २२ रुग्ण आढळले.

आतापर्यंत पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजाराच्या पुढे गेली आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या २२६ वर पोहोचली आहे.

अशी भयानक परिस्थिती असतानाही नागरिक विना कारण बाहेर फिरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.या नागरिकांना चाप बसावा म्हणून यापुढे पुणे पोलिसांसोबत आरएएफच्या जवानांचीही अशा लोकांवर नजर असणार आहे.

Related posts

थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबरपासून ‘अभय’ योजना

Vishal Khandagale

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

Leave a Comment