पुणे : शहरातील वाढत्या लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांच्या संख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘Pune Area Decongestion Plan’ सादर केला आहे. या योजनेअंतर्गत नवीन प्लॅटफॉर्म उभारणी, तिसरी-चौथी रेल्वे लाईन, उपनगरी (EMU) टर्मिनल्स आणि सॅटेलाईट टर्मिनल्स विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
🔹 प्रमुख प्रस्ताव
📍 पुणे रेल्वे स्थानक
६ नवीन प्लॅटफॉर्म उभारणी
प्लॅटफॉर्म क्र. २, ३, ४, ५ व ६ चा विस्तार
EMU टर्मिनल उभारणी
GCMC–हडपसर तिसरी लाईन
📍 हडपसर
सॅटेलाईट टर्मिनल म्हणून विकास
अतिरिक्त स्टेबलिंग लाईनचे काम सुरू
२ अतिरिक्त लूप लाईन प्रस्तावित
📍 शिवाजीनगर
EMU टर्मिनल म्हणून विकास
📍 दापोडी
लाँग हॉल लूपसह ‘बी’ दर्जाचे स्थानक
🔹 इतर महत्त्वाचे प्रकल्प
पुणे–दौंड–वाडी तिसरी व चौथी लाईन
तळेगाव–उरुळी नवीन दुहेरी ब्रॉडगेज लाईन
पुणे–आळंदी तिसरी लाईन
मांजरी बुद्रुक येथे नवीन ‘बी’ दर्जाचे स्थानक
रामटेकडी येथे नवीन ब्लॉक स्टेशन
फुरसुंगी येथे ५ स्टेबलिंग लाईन
आळंदी येथे कोचिंग टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव
उरुळी येथे नवीन कोचिंग टर्मिनल प्रस्तावित
पुणे स्थानकावरील गर्दी कमी होणार उपनगरी रेल्वे सेवेला मोठी चालना हडपसर, वाघोली, लोहगाव, मांजरी, फुरसुंगी व आळंदी परिसरातील प्रवाशांना सुविधा मालवाहतुकीस स्वतंत्र मार्ग गाड्यांच्या वेळेत सुधारणा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे आयटी पार्क, औद्योगिक व निवासी भागांना फायदा होणार आहे. विशेषतः हडपसर, वाघोली, लोहगाव, मांजरी, फुरसुंगी आणि आळंदी परिसरातील विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.

