पुणे

“श्रीं” ची प्राणप्रतिष्ठापणा प्रथमच अध्यक्ष, पदाधिकारी करणार

PUNE CITY NEWS :-  मानाच्या गणेश मंडळातील गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा मंडळाच्या अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्यामुळे आठ गणेश मंडळाचे पदाधिकारी ही विधिवत पूजा करणार आहेत. अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यामुळे मानाचा असणारा श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या १२८ वर्षात प्रथमच अशी नवी नोंद घेतली जाणार आहे. यंदा पुण्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

Vishal Khandagale

कोंढवा खुर्द “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीऔषध वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX