Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. हरहुन्नरी अभिनेता निवर्तल्यामुळे कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

जयराम कुलकर्णी यांच्याविषयी

जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे होय. त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण केले. याठिकाणी त्यांची श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली.

जयराम यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती. त्यांनी विविध नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी अभिनेते महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले.

गाजलेले चित्रपट : ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ आणि इतर चित्रपट

दरम्यान, आज दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार

Vishal Khandagale

घुसमट,नैराश्य आणि आत्महत्या! – सुहास सोहोनी

Vishal Khandagale

उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांचे कचऱ्याविरोधात आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment